कोथरूडकरांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो, पीएमपी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:03 IST2025-11-16T11:03:35+5:302025-11-16T11:03:44+5:30
कोथरूडकरांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानक, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे असणे महत्त्वाचे आहे. कोथरूड भागात वनाझ, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, एसएनडीटी, गरवारे, अशा काही भागांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ

कोथरूडकरांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो, पीएमपी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे
कोथरूड : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (दि. १०) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला असल्याची ताजी घटना असताना आता पुणे शहरात विविध ठिकाणी पोलिस यंत्रणा, संबंधित विभाग खडबडून जागे झाले आहेत.
घातपात कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी होऊ नये म्हणून जागोजागी कॅमेरे लावणे महत्त्वाचे ठरते. कोथरूडकरांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानक, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे असणे महत्त्वाचे आहे. कोथरूड भागात वनाझ, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, एसएनडीटी, गरवारे, अशा काही भागांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.
अनेक ठिकाणी मेट्रो थांबे आहेत. मात्र या ठिकाणी फुटपाथ तसेच मेट्रो थांब्याचे काही भागांच्या ठिकाणी कॅमेरे बसवलेले दिसून येत नाहीत. यात मेट्रो थांबालगतच काही शहर बसवांबा आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी व नागरिकांची वर्दळ असते. दिल्लीसारख्या स्फोटाच्या घटना थांबवणे कोथरूडकरांच्या व सुरक्षिततेसाठी थांब्यावर कैमेरे असणे महत्त्वाचे झाले आहे. या यंत्रणांमुळे पोलिसांना आरोपी पकडणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. गुन्हेगारी रोखणे तसेच मध्यंतरी विविध ठिकाणी गोळीबार, कोयता गैंग यांचा धुमाकूळ या परिसरात झाला होता, त्या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्यांची आवश्यकता कोथरूडकरांना आहे.
प्रशासन व यंत्रणा कोथरूडकरांच्या सुरक्षितेच्या विषयी अजून जागरूक झालेले दिसत नाही. हा मुद्दा खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. एखादी दिल्लीसारखी घटना झाल्यास मग प्रशासनाला जाग येते. कोथरूडमध्ये गैंगवॉरसारख्या घटना सतत होत आहे. त्यात पोलिस यंत्रणेने अत्यंत निष्काळजीपणाची कॅमेरे बसविलेले नाहीत ही बाब आहे. - दत्तात्रेय महाराज तेरदाळे, स्थानिक कोथरूडकर,
मेट्रोच्या आतील भागात कॅमेरे लावलेले आहेत. मेट्रोच्या ज्युरिडिक्शनमध्ये कॅमेरे आहेत. मेट्रो स्थानाच्या आतमध्ये प्रवेश करताना नागरिक दिसतात, परंतु बाहेरील भागात कॅमेरे नाहीत. - चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, पुणे मेट्रो
मेट्रो स्थानकातील दिव्यांग तसेच अन्य प्रवाशांसाठी आम्ही मदत करतो. प्रवेशद्वारावर कॅमेरे लागलेले आहे, मात्र बाहेरील भागात कॅमेरे दिसत नाहीत. - मेट्रो स्थानकावरील शिपाई, मेट्रो