Video : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण कळतं का? अंजली दमानियांची अजित पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 14:26 IST2025-10-12T14:26:22+5:302025-10-12T14:26:53+5:30
दमानियांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Video : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण कळतं का? अंजली दमानियांची अजित पवारांवर टीका
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला
माध्यमांशी बोलतांना दमानिया पुढे म्हणाल्या, क्षुल्लक गोष्टींवरून आपण नेहमीच राजकारण करत असतो, पण महाराष्ट्रावर सध्या तब्बल नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. हे पैसे आपण कुठून आणणार, यावर मात्र कोणीही चर्चा करत नाही. कारण आपल्या राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. दमानियांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या पात्रतेवर भाष्य करताना त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानियांची ही टीका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.