रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:22 IST2025-06-27T21:20:47+5:302025-06-27T21:22:47+5:30

लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,

pune news the politics going on over naming the railway station is dirty; MP Kulkarni is angry over flexi-baazi | रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या

रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मी मागणी केल्यानंतर त्यावरून सुरू असलेले राजकारण घाणेरडे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मी मागणी केली आहे. लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केली. ज्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, त्यांची नावे त्या फ्लेक्सवर होती, याचे वाईट वाटते असे म्हणत त्या भावूक झाल्या.



कुलकर्णी म्हणाल्या, रेल्वे स्थानकाच्या नावावरून सुरू असलेले राजकारण अतिशय घणेरडे आहे. स्थानकाला नाव देण्यासाठी कोणीही वेगवेगळी नावे सुचवू शकतात. लोकशाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव सुचवले. त्यांचे नाव भूषणावह असून, त्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मस्तानीचे नाव बुधवार पेठेला द्या, असे फ्लेक्स शहरात लावले गेले. हे खालच्या दर्जाचे राजकारण आहे. हा प्रकार निंदनीय आहे.

मस्तानी या बाजीराव पेशवे यांच्या पत्नी होत्या. त्या एक योद्धादेखील होत्या. असे फ्लेक्स लावून त्यांची हेटाळणी करण्यात आली. त्यांनी देशात पहिला आंतरधर्मीय विवाह केला. महिलांविषयी बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. या फ्लेक्समुळे मला खूप वाईट वाटले. जे नवीन आहेत, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मात्र, ज्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, त्यांची नावे त्या फ्लेक्सवर होती. त्यामुळे मला वाईट वाटले. काळ सोकावता कामा नये, त्यामुळे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खा. कुलकर्णी यांनी केली.

Web Title: pune news the politics going on over naming the railway station is dirty; MP Kulkarni is angry over flexi-baazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.