Pune News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 23:46 IST2026-04-05T23:44:58+5:302026-04-05T23:46:02+5:30

Crime News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना इंदोरी येथे घडली.  

Pune News: Student dies after iron pole falls on him while playing basketball | Pune News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Pune News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी : बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी सात वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तळेगाव-चाकण रस्त्यावरील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात घडली. 

विशाल वर्मा (वय २०, तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विद्यार्थी वसतिगृह, इंदोरी, ता. मावळ, पुणे. मूळ रा. आयोध्या, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोलानी इन्स्टिट्यूटच्या आवारात विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. दरम्यान, विशाल हा बास्केटबॉल रिंगला लटकला असता रिंग तुटली आणि त्यापाठोपाठ लोखंडी खांब देखील खाली पडला.

लोखंडी खांब अंगावर पडल्याने विशाल गंभीर जखमी झाला. तात्काळ उपचारासाठी त्याला तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title : पुणे: बास्केटबॉल पोल गिरने से छात्र की मौत

Web Summary : पुणे के पास इंदोरी में बास्केटबॉल खेलते समय पोल गिरने से विशाल वर्मा नामक एक छात्र की मौत हो गई। घटना तोलानी मैरीटाइम इंस्टीट्यूट में हुई। उसे तालेगांव दाभाड़े के एक अस्पताल ले जाया गया, जहां उसने दम तोड़ दिया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Student Dies After Basketball Pole Falls on Him

Web Summary : A student, Vishal Verma, died in Indori near Pune after a basketball pole fell on him while playing. The incident occurred at Tolani Maritime Institute. He was rushed to a hospital in Talegaon Dabhade, where he succumbed to his injuries. Police are investigating.