शिक्रापुरात भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; ११ वर्षीय मुलगी गंभीर, ससूनमध्ये उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 09:36 IST2026-04-10T09:36:12+5:302026-04-10T09:36:52+5:30

- अंजलीच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक सुभाष आदक यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले आणि तिचे प्राण वाचवले.

pune news stray dogs attack girl in Shikrapur; 11-year-old girl critical, undergoing treatment in Sassoon | शिक्रापुरात भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; ११ वर्षीय मुलगी गंभीर, ससूनमध्ये उपचार

शिक्रापुरात भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; ११ वर्षीय मुलगी गंभीर, ससूनमध्ये उपचार

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शाळेतून घरी परतणाऱ्या ११ वर्षीय अंजली गोपाल राठोड या मुलीवर ७ ते ८ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अंजली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाबळ चौक परिसरात राहणारी अंजली ही आपल्या लहान भावाला पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोडून घरी परतत असताना साई पर्ल सोसायटीसमोर अचानक कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी तिच्या शरीरावर गंभीर जखमा केल्या. अंजलीच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक सुभाष आदक यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावले आणि तिचे प्राण वाचवले.

घटनेनंतर अंजलीला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सरपंच रमेश गडदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन सरपंच गडदे यांनी दिले. 

Web Title : शिक्रापुर में आवारा कुत्तों का बच्ची पर हमला; गंभीर रूप से घायल।

Web Summary : शिक्रापुर में, स्कूल से लौट रही 11 वर्षीय बच्ची पर आवारा कुत्तों के झुंड ने हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई। एक स्थानीय निवासी ने हस्तक्षेप कर उसे बचाया। उसका ससून अस्पताल में इलाज चल रहा है। स्थानीय लोग आवारा कुत्तों के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Stray dogs attack girl in Shikrapur; seriously injured.

Web Summary : In Shikrapur, a pack of stray dogs attacked an 11-year-old girl returning from school, leaving her seriously injured. A local resident intervened, saving her. She is undergoing treatment in Sassoon Hospital. Locals demand immediate action against stray dogs.