राखी पौर्णिमेला पुणे एसटी विभागाला साडेसात कोटींचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:16 IST2025-08-13T12:15:43+5:302025-08-13T12:16:21+5:30
पुणे : राखी पौर्णिमा आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे दि. ८ ते ११ ऑगस्ट या तीन दिवसांत प्रवाशांकडून एसटीला ...

राखी पौर्णिमेला पुणे एसटी विभागाला साडेसात कोटींचे उत्पन्न
पुणे : राखी पौर्णिमा आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे दि. ८ ते ११ ऑगस्ट या तीन दिवसांत प्रवाशांकडून एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या तीन दिवसांत पुणे एसटी विभागाला सात कोटी ४१ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.
एसटी महामंडळाकडून रक्षाबंधन, दिवाळी या काळात जादा बस सोडण्यात येते. शिवाय रक्षाबंधनाला भावाकडे जाणाऱ्या बहिणींची संख्या जास्त असते. त्यामुळे जादा बस सोडण्यात येतात. यंदा राखी पौर्णिमेला लागून सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळे पुणे एसटी विभागाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा फायदा एसटी महामंडळाला झाल्याचे दिसून आले. राखी पौर्णिमेच्या दिवशी दोन कोटी ६० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर राज्यात या दिवशी ३९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. राज्यात चार दिवसांमध्ये एसटीतून एक कोटी ९३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले.
पुणे विभागातील तीन दिवसांचे उत्पन्न
९ ऑगस्ट - दोन कोटी ४२ लाख
१० ऑगस्ट - दोन कोटी ३९ लाख
११ ऑगस्ट - दोन कोटी ६० लाख