पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 20:00 IST2026-01-18T20:00:02+5:302026-01-18T20:00:24+5:30

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि त्याला जोडणारे इतर उपरस्ते साेमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवावे लागणार आहे.

Pune news Schools, colleges closed today; Traffic banned on some roads in Pune | पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी 

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी 

पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा दि. १९ ते २३ जानेवारीदरम्यान पुणे जिल्ह्यात होणार आहेत. या अंतर्गत साेमवारी (दि. १९) शहरात प्रोलाँग रेस होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

याचबरोबर फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि त्याला जोडणारे इतर उपरस्ते साेमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवावे लागणार आहे. यात परिसरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय हाेऊ नये म्हणून सुटी देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर घोले रोड, विश्रामबागवाडा कसबा, ढोले-पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड बावधन, सिंहगड रोड, वारने-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्व अंगणवाडी, शासकीय व खासगी प्राथमिक / माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, महापालिका शाळा, महाविद्यालये, आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना साेमवारी सुटी देण्यात आली आहे. 

Web Title : पुणे में कल स्कूल, कॉलेज बंद; यातायात प्रतिबंध लागू

Web Summary : पुणे में पुणे ग्रैंड चैलेंज टूर-2026 साइकिलिंग प्रतियोगिता के कारण सोमवार को स्कूल और कॉलेज बंद रहेंगे। फर्ग्युसन कॉलेज रोड और गणेशखिंड रोड जैसी प्रमुख सड़कों पर सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक यातायात प्रतिबंध रहेगा। इसका उद्देश्य कार्यक्रम के दौरान छात्रों को होने वाली असुविधा को रोकना है।

Web Title : Pune Schools, Colleges Closed Tomorrow; Traffic Restrictions Imposed

Web Summary : Pune schools and colleges are closed Monday due to the Pune Grand Challenge Tour-2026 cycling competition. Traffic restrictions will be in place on key roads like Fergusson College Road and Ganeshkhind Road from 9 AM to 6 PM. This aims to prevent student inconvenience during the event.