राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:07 IST2026-03-29T16:06:23+5:302026-03-29T16:07:32+5:30

या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले.

pune news rajgurunagar shaken Police officer dies in rickshaw-bullet accident | राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू

राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू

पुणे - राजगुरुनगर (ता. खेड) येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना पाबळ रोडवरील चव्हाण मळा, टाकळकरवाडी फाटा परिसरात घडली. मृत पोलीस अंमलदाराचे नाव शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी, ता. खेड) असे असून ते महालुंगे पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २८) रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास शशिकांत होले हे बुलेट मोटारसायकलवरून आपल्या होलेवाडी येथील घरी जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या रिक्षाने अचानक वळण घेतल्याने बुलेट आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले.

त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शशिकांत होले हे धाडसी व कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे बंधू श्रीकांत होले हेही पोलीस दलात कार्यरत आहेत. राजगुरुनगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने होलेवाडीसह संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : राजगुरुनगर में सनसनी: रिक्शा-बुलेट टक्कर में पुलिस अधिकारी की मौत

Web Summary : राजगुरुनगर के पास एक दुखद दुर्घटना में कर्तव्यनिष्ठ पुलिस अधिकारी शशिकांत होले की मौत हो गई। उनकी मोटरसाइकिल एक रिक्शा से टकरा गई, जिससे उनके सिर में घातक चोटें आईं। होले, अपनी बहादुरी और समर्पण के लिए जाने जाते थे, 37 वर्ष के थे और उनके पीछे उनकी पत्नी और दो बच्चे हैं। इस घटना से पूरे क्षेत्र में शोक की लहर है।

Web Title : Rajgurunagar shaken: Police officer dies in rickshaw-bullet collision.

Web Summary : A dedicated police officer, Shashikant Hole, died in a tragic accident near Rajgurunagar. His motorcycle collided with a rickshaw, causing fatal head injuries. Hole, known for his bravery and dedication, was 37 and leaves behind his wife and two children. The incident has cast a pall of gloom over the region.