पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नागरिकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सोडणार आहे. रविवार, दि. ८ रोजी स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून प्रसिद्ध आठ पर्यटन बस मार्गांवर वातानुकूलित ई-बस सोडण्यात येणार आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद नागरिकांना घेता यावा, या उद्देशाने पीएमपीने यापूर्वी एकूण १३ पर्यटन बसमार्ग सुरू केले आहेत. या पर्यटन बससेवेला पर्यटक व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांच्या बुकिंगनुसार बसेस सोडल्या जात आहेत. महिला दिन आणि रविवारची सुट्टी यांचा योग साधत नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळावी, यासाठी या विशेष बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी स्वारगेट बसस्थानकावरून ८ वातानुकूलित ई-बस विविध पर्यटन मार्गांवर धावणार आहेत.
या पर्यटन बससेवेअंतर्गत प्रति व्यक्ती फक्त ५०० रुपये इतक्या परवडणाऱ्या तिकीट दरात पुणे परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांची दिवसभरात सफर करता येणार आहे. कुटुंब, मित्रपरिवारासह तसेच विशेषतः महिला प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेऊन रविवारची सुट्टी पर्यटनासाठी उपयोगात आणावी, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे. या पर्यटन बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक आणि निगडी बसस्थानक या पास केंद्रांवर करता येणार आहे.
Web Summary : On Women's Day, PMP offers special tourist bus services from Swargate. Eight air-conditioned e-buses will run on popular routes, costing ₹500 per person. Bookings are available at various bus stations. Enjoy religious, historical, and scenic spots.
Web Summary : महिला दिवस पर, पीएमपी ने स्वारगेट से विशेष पर्यटन बस सेवा शुरू की है। आठ वातानुकूलित ई-बसें लोकप्रिय मार्गों पर चलेंगी, जिसका किराया ₹500 प्रति व्यक्ति है। बुकिंग विभिन्न बस स्टेशनों पर उपलब्ध है। धार्मिक, ऐतिहासिक और प्राकृतिक स्थलों का आनंद लें।