शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:18 IST

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते,

आसखेड : चार तालुक्यांसह पुणेपिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन १० एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्यात आले. त्यासाठी १ हजार २०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस १२०० क्युसेकने सोडण्यात आले होत. या पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूरमधील ४, हवेलीमधील ४ तर दौंडमधील ६ बंधारे (एकूण २४ बंधारे) भरण्यात आले. परंतु, त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला. परंतु, गेले दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधाऱ्यांतील पाणी किमान ७ ते ८ दिवस वापरले जाणार नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत पावसाने दडी मारली तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी व्यक्त केला आहे.

यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दलघमी (१.६३ टीएमसी) इतका असून, धरणसाठा १५.०९ टक्के आहे तर गतवर्षी २०.१५ टक्के इतका होता.

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे. या ३३ दिवस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे २४ बंधारे भरले. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असूनही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेला अडचण येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड