Video : यळकोट यळकोट जय मल्हार...! पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीराला शिखरी काठ्यांची देवभेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 17:31 IST2026-01-04T17:18:29+5:302026-01-04T17:31:27+5:30
गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते.

Video : यळकोट यळकोट जय मल्हार...! पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीराला शिखरी काठ्यांची देवभेट
जेजुरी - पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो.यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदीरावर आज रविवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता.दौंड) येथील होलम काठीने शिखराला काठी टेकविण्याचा मान घेतला. यावेळी सात ते आठ प्रासादिक काठया सहभागी होत्या.यावेळी भाविकांनी जल्लोष करित भंडा-याची उधळण करीत
गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते. आज सकाळी वाजत गाजत काठी गडावर आली. काठीप्रमुख शहाजी खैरे व भाविक होते. दुपारी साडेबारा वाजता खैरे व होलम यांची काठी टेकविण्याचा मान पार पडला. त्यानंतर मंदीर प्रदक्षिणा घेण्यात आली.भाविकांनी भंडारा उधळून जल्लोष करित प्रदक्षिणा पुर्ण केली.
जेजुरी - पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो.यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदीरावर आज रविवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता.दौंड) येथील होलम काठीने शिखराला काठी टेकविण्याचा मान घेतला. #jejuri#pune#Maharashtrapic.twitter.com/uiApJGKWUa
— Lokmat (@lokmat) January 4, 2026
तांबडे-पांढरे निशान हे या काठीची ओळख आहे. तांबडे-पांढरे वस्त्रांनी काठी सजविण्यात आली होती.गावातही अनेक ठिकाणी काठीने मानाचे कार्यक्रम घेतले. पौष पौर्णिमेला काठी आणण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. खंडोबा-म्हाळसाच्या लग्नाचा सोहळ्यानिमित्त दुस-या दिवशी काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रम परंपरेनुसार चालत आला असल्याचे खैरे काठीचे मानककऱ्यांनी सांगितले. माघी पौर्णिमा एवढेच याही पौष पौर्णिमेला महत्व असल्याचे सांगाण्यात आले.
मार्तंड देव संस्थान च्या वतीने प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे,विश्वस्त अड पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, यांनी काठीच्या मानकऱ्यांचा सन्मान केला. पौर्णिमा यात्रा आणि रविवार असल्याने दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची मोठीं गर्दी होती.