नव्वद टक्के आरक्षण फुल; सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नागपूर 'वंदे भारत' ला मोठा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:04 IST2025-08-14T10:03:57+5:302025-08-14T10:04:25+5:30

पुण्यावरून खान्देश आणि विदर्भात जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे सेवा कमी असल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो

pune news ninety percent reservation full; Pune-Nagpur Vande Bharat receives huge response due to consecutive holidays | नव्वद टक्के आरक्षण फुल; सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नागपूर 'वंदे भारत' ला मोठा प्रतिसाद

नव्वद टक्के आरक्षण फुल; सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नागपूर 'वंदे भारत' ला मोठा प्रतिसाद

पुणे : प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे-नागपूर दरम्यान रविवार (दि. १०) रोजी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. त्यानंतर सलग सुट्ट्या असल्यामुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत पुणे ते नागपूर दरम्यान ही गाडी नव्वद टक्के फुल होती.

नोकर, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत, ज्यात विदर्भातील लोकांची संख्या जास्त आहे. परंतु पुण्यावरून खान्देश आणि विदर्भात जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे सेवा कमी असल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. परिणामी, तिकीट दरापेक्षा जास्त पैसे मोजून प्रवास करावा लागतो. पुण्याहून धावणाऱ्या नागपूर एक्स्प्रेससह इतर रेल्वे गाड्यांमध्ये बारमाही गर्दी असते.

वाढत्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आरामदायी प्रवासासाठी पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आता १५ ऑगस्टमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या लागल्यामुळे या गाडीसाठी प्रवाशांची गर्दी वाढली असून, वेटिंगदेखील आहे.

वंदे भारतचे वेळापत्रक असे आहे :

- पुण्याहून सुटण्याची वेळ : सकाळी ६:२५

- नागपूरहून सुटण्याची वेळ : सकाळी ९:५०

- पुण्यातून न सुटण्याचा दिवस : गुरुवार

- नागपूरहून न सुटण्याचा दिवस : सोमवार

येणारे थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेरा, वर्धा.

तिकीट दर (रुपयांत) :

| ठिकाण | चेअर कार | एक्झिक्युटिव्ह चेअर कार |

| पुणे - अहिल्यानगर | ६६५ | ११९५             

| पुणे - कोपरगाव | ८६५ | १५९५             

| पुणे - मनमाड | ९२० | १७२०             

| पुणे - जळगाव | १४०० | २२४७             

| पुणे - भुसावळ | १४५० | २५६५        

| पुणे - शेगाव | १६२० | २९१५              

| पुणे - अकोला | १६७० | ३०३०          

| पुणे - वडनेरा | १८२० | ३३३०       

| पुणे - वर्धा | १९५५ | ३५७५         

| पुणे - नागपूर | २०४० | ३७२५   

पुणे ते नागपूर वंदे भारतला प्रवाशांकडून महत्त्वाचा प्रतिसाद मिळत आहे. सुट्ट्यांमुळे ही गाडी फुल जात आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी

Web Title: pune news ninety percent reservation full; Pune-Nagpur Vande Bharat receives huge response due to consecutive holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.