Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:13 IST2025-08-26T09:12:27+5:302025-08-26T09:13:11+5:30

राज्य सरकारने यासंदर्भातील नियम आणि आदेशांचे राजपत्र जारी केले आहे.

pune news New reservation will be made for pune zilla parishad | Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार

पुणे -  पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट आणि पंचायत गण यांचे आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आरक्षणाचा कोणताही विचार न करता, २०११ च्या जनगणनेनुसार हे नवे आरक्षण यावर्षीपासून लागू होईल. राज्य सरकारने यासंदर्भातील नियम आणि आदेशांचे राजपत्र जारी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण ७३ गट आणि १३ पंचायत समित्यांमध्ये १४६ गण निश्चित करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचे आरक्षण हे जिल्ह्यातील गटांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमाने निश्चित केले जाईल, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि महिलांचे आरक्षण सोडतीद्वारे ठरवले जाईल.

आरक्षणाची रचना :
अनुसूचित जाती (एससी) : एकूण ७ गट आरक्षित, यापैकी ४ गट महिलांसाठी.
अनुसूचित जमाती (एसटी) : एकूण ५ गट आरक्षित, यापैकी ३ गट महिलांसाठी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी): २७
टक्के आरक्षणानुसार २० जागा आरक्षित, यापैकी १० जागा ओबीसी महिलांसाठी.
सर्वसाधारण प्रवर्ग : एकूण ४१ जागा, यापैकी २० जागा महिलांसाठी आरक्षित.  

Web Title: pune news New reservation will be made for pune zilla parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.