शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:16 IST

- नोंदणी विभागाकडून ६ एप्रिल रोजी सुनावणी

पुणे :मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या दस्तनोंदणीत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्याबाबत नोंदणी विभागाने सुनावणीसाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात सोमवारी (दि. १६) सुनावणी घेण्यात आली. त्यात कंपनीने म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. आता पुढील सुनावणीवेळी नोंदणी विभाग नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारात मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडून सात टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये तसेच २० मे २०२५ या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा १ टक्केप्रमाणे १ कोटी ४७ लाख दंड असा एकूण २२ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम भरण्यासाठी पुढील दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत १२ फेब्रुवारीला संपली. त्यानंतर कंपनीकडून नोंदणी विभागाकडे या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती. यात कंपनीच्या वकिलांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली होती.

मात्र, त्यांना केवळ १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ही सुनावणी ३ मार्च रोजी झाली. त्यातही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सुनावणीला मुदतवाढ मागण्यात आली. हे प्रकरण अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने नैसर्गिक न्यायानुसार विभागाने मुदतवाढीची मागणी मान्य करत सोमवारी (दि. १६) सुनावणी ठेवली होती. त्यात कंपनीने पुन्हा पुढील तारीख देण्याची मागणी केली. यावेळीही पुन्हा ते कारण देण्यात आले आहे. ही मागणी मान्य करत आता६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mundhwa Land Scam Hearing: Third Extension Granted to Parth Pawar's Company

Web Summary : The hearing regarding stamp duty evasion by Parth Pawar's company in the Mundhwa land scam has been extended for the third time, now to April 6th. The registration department will decide on the matter then, after the company requested another extension to present its case.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMundhvaमुंढवाCrime Newsगुन्हेगारीparth pawarपार्थ पवार