शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : शिवगंगा खोऱ्यातील हॉटेल व्यावसायिकांची 'चुलीकडे' धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:30 IST

- गॅसअभावी व्यवसाय थांबवण्याऐवजी अनेक व्यावसायिकांनी आता पारंपरिक 'चुली' वर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

खेडशिवापूर : अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामधील युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. कमर्शियल गॅस पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला तुटवडा यामुळे शिवगंगा खोऱ्यातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गॅसअभावी व्यवसाय थांबवण्याऐवजी अनेक व्यावसायिकांनी आता पारंपरिक 'चुली' वर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.

शिवगंगा खोऱ्यातील खेड-शिवापूर, नसरापूर आणि आसपासच्या परिसरात हॉटेल व्यवसायाची मोठी रेलचेल आहे. मात्र, अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने तसेच कमर्शियल गॅस सिलिंडर मिळणे बंद झाल्याने, हॉटेलमालकांनी आता आपल्या किचनमध्ये चुली मांडल्या आहेत.

एकीकडे सिलिंडरचा तुटवडा ही समस्या असली, तरी दुसरीकडे ''चुलीवरचे जेवण'' ही ग्राहकांसाठी पर्वणी ठरत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव सुरू केलेला हा पर्याय आता ग्राहकांना आकर्षित करत आहे. चुलीवरच्या मटण रस्सा, भाकरी आणि पिठलं-भाकरीला पर्यटकांकडून मोठी मागणी मिळत असल्याचे हॉटेलचालकांनी सांगितले. गॅसअभावी हॉटेल बंद ठेवणे शक्य नाही, म्हणून आम्ही पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. यामुळे कष्ट वाढले असले, तरी ग्राहकांना चुलीवरच्या अन्नाची चव आवडत आहे. 

सिलिंडरच्या तुटवड्यामुळे केवळ हॉटेल व्यावसायिकच नव्हे, तर खानावळी चालवणारे आणि छोटे टपरीचालकही त्रस्त आहेत. शासनाने आणि संबंधित गॅस कंपन्यांनी या तुटवड्यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी शिवगंगा खोऱ्यातील व्यापारी वर्गातून होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर अनेक छोट्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.    - सत्यवान वाडकर, हॉटेल व्यावसायिक

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Crisis Drives Shivganga Valley Hoteliers Back to Traditional Stoves

Web Summary : LPG shortage due to global conflicts forces Shivganga Valley hoteliers to revert to wood-fired stoves. Customers enjoy the traditional taste, creating unexpected demand for 'chulha' cuisine. Small businesses fear closure if the gas crisis persists.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडर