पुणे : गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम शहरातील हॉटेल आणि खानावळी व्यवसायावर होत असून त्याचा फटका मार्केटयार्डातील पालेभाज्यांना ही बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक हॉटेल व खानावळी बंद राहिल्याने मार्केटयार्डातून होणारी भाज्यांची खरेदी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरली आहे.
परिणामी गाळ्यांवर भाज्या शिल्लक राहू लागल्या असून तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनाही बसला असून नुकसान सहन करावा लागत आहे. परिणामी भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणी कमी झाल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहरातील हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेते, केटरिंग व्यावसायिक तसेच मंगल कार्यालयांतील स्वयंपाकी हे भाजीपाल्याचे प्रमुख ग्राहक मानले जातात. या व्यावसायिकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी होते. काही जण थेट मार्केटयार्डातून खरेदी करतात, तर काही पुरवठादारांमार्फत माल घेतात. मात्र, गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल-खानावळींचे कामकाज मंदावले आहे. अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल आणि खानावळीचालकांनी भाज्यांची खरेदी कमी केली आहे. पालेभाज्या नाशवंत असल्याने त्यांची रोज विक्री करणे आवश्यक असते. त्यामुळे दर घसरले आहे. मार्केटयार्डात दररोज साधारण ७०-८० गाड्यांद्वारे आवक होते. सध्या मागणीत ३०-४० टक्क्यांनी घट झाली असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. - विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, मार्केटयार्ड
मार्केट यार्ड बाजारात विक्री न झालेला माल गाळ्यांवर शिल्लक राहत आहे. विविध भाज्यांच्या भावात घसरण झाली असून, गॅसपुरवठा सुरळीत न झाल्यास दरावर आणखी परिणाम होऊ शकतो. - राजेद्र सूर्यवंशी, तरकारी, आडते
Web Summary : Pune's gas cylinder shortage impacts hotels, causing a 30-40% drop in vegetable sales at Market Yard. Excess supply leads to 10-20% price decrease, hurting farmers and traders. Reduced demand, particularly for leafy greens, results in financial strain due to perishable goods.
Web Summary : पुणे में गैस सिलेंडर की कमी से होटलों पर असर, जिससे मार्केट यार्ड में सब्जियों की बिक्री में 30-40% की गिरावट आई। अधिक आपूर्ति से कीमतों में 10-20% की कमी, किसानों और व्यापारियों को नुकसान। मांग में कमी से वित्तीय तनाव।