शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या बातमीचा दणका; बार्टीकडून पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:26 IST

बार्टी संस्थेच्या येरवडा येथील गोडाऊन बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो रुपयांची विविध पुस्तके ताडपत्रीत बांधून ठेवली असल्याने सतत पडणाऱ्या पावसाने ती खराब झाली आहेत.

लष्कर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांची महामानवाच्या विचारांची पुस्तके पावसात भिजून खराब झाल्याची बातमी ‘लोकमत’ मध्ये ७ ऑक्टोबरच्या अंकात फोटोसहित प्रकाशित झाली होती. त्याची दखल घेत आत बार्टीने पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी राहुल कवडे, प्रकल्प अधिकारी राहुल अहिवळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर सोनाली विटकर असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

बार्टी संस्थेच्या येरवडा येथील गोडाऊन बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो रुपयांची विविध पुस्तके ताडपत्रीत बांधून ठेवली असल्याने सतत पडणाऱ्या पावसाने ती खराब झाली आहेत. मात्र या स्थितीबाबत आंबेडकरी कार्यकर्ते आणि वाचकांनी अगदी सुरुवातीच्या काळातच बार्टी प्रशासनाच्या वेळोवेळी पत्रव्यवहार करून निदर्शनास आणले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते आणि त्यानंतर ही ग्रंथसंपदा पूर्णपणे खराब झाली होती. याबाबत ‘लोकमत’ मध्ये सविस्तर बातमी प्रकाशित झाली. त्यांनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणाला कारणीभूत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे. याबाबत चौकशी करून या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वारे यांनी दिली.लाखो रुपयांच्या खराब झालेल्या पुस्तकांमध्ये भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण आणि भाषणे, धम्मापद, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सीडी आणि बार्टीचे इतर प्रचार आणि प्रसाराचे साहित्य अशी मूल्यावर शासकीय पुस्तकांचा समावेश असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ग्रंथसंपदा वाया गेल्याची हळहळ आणि आंबेडकरी कार्यकर्ते व वाचकांकडून व्यक्त होत आहे. पुस्तकाच्या किमतीही केल्या पूर्ववत 

बार्टीच्या नियामक मंडळांच्या मान्यतेने व महालेखा निरीक्षक यांच्या सहमतीने वाढवलेल्या पुस्तकांच्या किमती (एकूण किमतीच्या ५० टक्के किमतीला) देखील पूर्ववत म्हणजे एकूण किमतीच्या केवळ १५ टक्के दराने देण्याचा निर्णयदेखील झाल्याचे भरतीने स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat Impact: Five BARTEE Officials Suspended After Book Spoilage

Web Summary : Lokmat's report on damaged books led to the suspension of five BARTEE officials. Negligence resulted in the spoilage of valuable books, prompting action after public outcry.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेEducationशिक्षण