Leopard Attack : डेरे गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:09 IST2025-11-25T18:06:31+5:302025-11-25T18:09:09+5:30
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेरे (ता. भोर) गावातल्या ईनामाच्या ओढ्याजवळ रात्री भटकणारा बिबट्या रस्त्यावर बसला होता.

Leopard Attack : डेरे गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महुडे : भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेरे (ता. भोर) गावातल्या ईनामाच्या ओढ्याजवळ रात्री भटकणारा बिबट्या रस्त्यावर बसला होता. डेरे गावातील पुण्यात राहणारे कुटुंब भात शेतीचे काम करून पुण्याकडे जात होते. ते रात्री साडेसातच्या सुमारास फिरताना दिसले.
या वेळी जयवंत अंबे यांच्या चारचाकी वाहनाला बिबट्याने धडक दिल्यामुळे या भागात, गावात भीतीचे माहोल निर्माण झाला आहे, अशी माहिती गावातील शरद डोंबे यांनी दिली. सदर कुटुंब पुण्यात जाऊन डोंबे यांनी त्यांची माहिती घेत विचारपूस केली आहे.
डेरे परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये व संध्याकाळच्या वेळेत फिरताना भ्रमध्वनीवर गाणी वाजवत, हातात काठी घेऊन, सोबतीला कोणी असल्याशिवाय फिरू नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.