पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:54 IST2025-10-03T19:53:29+5:302025-10-03T19:54:36+5:30
पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली किटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना वारसा हक लागू करण्यात बैठक घेण्यात आली

पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू
पुणे :पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील १५३ सेवकांना घाणभत्ता धुलाई भत्ता , वारसा हक्क लागू करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.
पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली किटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना वारसा हक लागू करण्यात बैठक घेण्यात आली. या पुणे महापालिकेडील अधिकारी , उपायुक्त प्रसाद काटकर , सामान्य प्रशासन उपायुक्त विजय थोरात , आरोग्य प्रमुख नीना बोराडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आदी उपस्थित होते. आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सायनोगेसिंग बिगारी, बिगारी, फिल्डवर्कर (डीस इन्फेक्शन बिगारी निर्जतुकीकरण) या सेवकांना घाणभत्ता धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करणेबाबत लाड/पागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील २४ फेबुवारी २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पालिकास्तरावर नियमोचीत कार्यवाही बाबत १७ जून २०२५ रोजी कळविण्यात आले होते.
त्यानुसार पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यांनी निर्णय घेवून बिगारी सेवकांना न्याय दिला आहे. या सेवकांना शासन निर्णयानुसार २००६ पासून वारस हक्क लागू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पात्र सेवकांची सर्व कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार पुढील कार्यवाही आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभागाने संयुक्त करावी असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.