प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ..! खडकी-हिसार, दौंड-अजमेर विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:57 IST2026-01-02T19:56:54+5:302026-01-02T19:57:26+5:30
- गाडी क्रमांक ०९६२५ आणि ०९६२६ अजमेर-दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण १० फेऱ्या दि. ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ..! खडकी-हिसार, दौंड-अजमेर विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ
पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेकडून साईनगर शिर्डी-बिकानेर, खडकी-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा गाड्यांची व्यवस्था झाल्यामुळे प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
गाडी क्रमांक ०४७१५ आणि ०४७१६ बिकानेर-साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष गाड्याच्या दि. ३१ जानेवारीपर्यंत एकूण दहा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ०४७२५ आणि ०४७२६ हिसार-खडकी-हिसार साप्ताहिक विशेष गाड्याच्या २६ जानेवारीपर्यंत एकूण आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक ०९६२५ आणि ०९६२६ अजमेर-दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण १० फेऱ्या दि. ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक ०९६२७ आणि ०९६२८ अजमेर-सोलापूर-अजमेर साप्ताहिक स्पेशल गाड्यांच्या दि. २९ जानेवारीपर्यंत एकूण आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या गाड्या ‘ट्रेन्स ऑन डिमांड’ (टओडी) म्हणून चालवल्या जातात आणि त्यांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे तपासावेत.