पुणे - मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमात केलेल्या खर्चावरून टीकेचे धनी बनलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि त्याला कारणीभूत ठरलंय ते त्यांचं पुण्यातील कीर्तन.. पुण्यातील हडपसर परिसरात महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. मात्र आयोजकांनी यासाठी रस्ताच अडवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हडपसर परिसरात भली मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव यांनी अखेर त्यांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. सध्या पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक इच्छुक आपल्या प्रभागात नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. पुण्यातील काळेपडळ परिसरातही अशाच एका इच्छुक कार्यकर्त्याने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा आयोजन केलं होतं, आणि यासाठी चक्क वाहतुकीचा रस्ताच अडवण्यात आला होता. परिणामी रस्त्यावर भली मोठी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगाच लागल्या. संतप्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येत थेट महाराजांना उद्देशूनच महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलिस अधिकारी जाधव यांनी सांगितल्यानंतर महाराजांनीही काही वेळ कार्यक्रम बंद ठेवला.
Web Summary : Police stopped Indurikar Maharaj's kirtan in Pune's Hadapsar due to traffic congestion caused by organizers blocking the road. An officer requested the program be halted, urging attendees to clear the road for public access before the event resumed.
Web Summary : पुणे के हडपसर में सड़क बाधित होने से पुलिस ने इंदुरीकर महाराज का कीर्तन रोक दिया। एक अधिकारी ने कार्यक्रम रोकने का अनुरोध किया, और उपस्थित लोगों से कार्यक्रम फिर से शुरू होने से पहले सड़क खाली करने का आग्रह किया।