शिक्रापूरमध्ये कारमधून बेकायदेशीर गॅस सिलिंडरची वाहतूक उघड; दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:46 IST2026-03-25T12:45:58+5:302026-03-25T12:46:21+5:30

- दहा सिलिंडर व कार जप्त; चाकण चौकात पोलिसांचा सापळा यशस्वी 

pune news Illegal transportation of gas cylinders by car exposed in Shikrapur Two arrested | शिक्रापूरमध्ये कारमधून बेकायदेशीर गॅस सिलिंडरची वाहतूक उघड; दोघे ताब्यात

शिक्रापूरमध्ये कारमधून बेकायदेशीर गॅस सिलिंडरची वाहतूक उघड; दोघे ताब्यात

शिक्रापूर : पुणे–नगर महामार्गावर शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक परिसरात बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दहा गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून वाहतूक नियमन सुरू असताना अहिल्यानगरकडून एक कार बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडर घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलिस हवालदार मिलिंद देवरे, ट्राफिक वार्डन अमोल राऊत, जिंदावली जमादार, किरण थोरात, अनिल वाडेकर व सुरेंद्र वाटोरे यांनी चाकण चौक परिसरात सापळा रचला.

थोड्याच वेळात अहिल्यानगरकडून एमएच २४ एयू ९०९७ ही कार येताना दिसली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता एचपी गॅस कंपनीचे घरगुती वापराचे सात व व्यावसायिक वापराचे तीन असे एकूण दहा सिलिंडर आढळून आले. याबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच सिलिंडरबाबत कोणत्याही प्रकारच्या पावत्या किंवा बिले नसल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिस हवालदार मिलिंद दिलीप देवरे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक दिलीप पवार (वय ३४, रा. परडी माटेगाव, ता. वडवणी, जि. बीड) व अनिल तुकाराम चव्हाण (वय २१, रा. जोगवाडा, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप करत आहेत.

Web Title : शिक्रापुर में अवैध गैस सिलेंडर जब्त; दो गिरफ्तार

Web Summary : शिक्रापुर में पुलिस ने कार से ले जाए जा रहे अवैध गैस सिलेंडरों को जब्त किया, दो गिरफ्तार। पुणे-नगर राजमार्ग पर चाकन चौक के पास दस सिलेंडर जब्त किए गए। मामला दर्ज, जांच जारी।

Web Title : Illegal Gas Cylinders Seized in Shikrapur; Two Arrested

Web Summary : Police in Shikrapur seized illegal gas cylinders transported by car, arresting two individuals. Ten cylinders were confiscated near Chakan Chowk on the Pune-Nagar highway. A case has been registered; investigation is ongoing.