प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! पुणे ते नागपूर रेल्वेच्या सहा विशेष फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:42 IST2026-02-13T13:41:53+5:302026-02-13T13:42:21+5:30

या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

pune news good news for passengers Six special trips from Pune to Nagpur Railway | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! पुणे ते नागपूर रेल्वेच्या सहा विशेष फेऱ्या

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! पुणे ते नागपूर रेल्वेच्या सहा विशेष फेऱ्या

पुणे : प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पुणेरेल्वे विभागाने पुण्यातून नागपूरसाठी सहा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष - (४ सेवा) : ट्रेन क्रमांक ०१४६७ सुपरफास्ट विशेष १३ आणि २० फेब्रुवारीला पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६८ सुपरफास्ट विशेष १४ आणि २१ रोजी नागपूर येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४१९ सुपरफास्ट विशेष १८ फेब्रुवारीला पुणे येथून दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२० सुपरफास्ट विशेष १९ फेब्रुवारीला नागपूर येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहोचेल. या गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असे थांबे देण्यात आले आहेत.

Web Title : यात्रियों के लिए खुशखबरी: पुणे-नागपुर विशेष ट्रेनें घोषित!

Web Summary : पुणे रेल मंडल ने यात्रियों की मांग को देखते हुए पुणे-नागपुर के लिए छह विशेष ट्रेनें शुरू की हैं। ट्रेनें फरवरी में चलेंगी, जिससे यात्रियों को राहत मिलेगी। ये ट्रेनें उरुली, दौंड और अकोला सहित विभिन्न स्टेशनों पर रुकेंगी।

Web Title : Good News for Passengers: Pune-Nagpur Special Trains Announced!

Web Summary : Pune Railway Division introduces six special Pune-Nagpur trains due to passenger demand. Trains will run in February, offering relief to travelers. The trains will stop at various stations including Uruli, Daund, and Akola.