येरवडा कॉमरझोन आयटी पार्कमध्ये सहाव्या मजल्यावर आग; अग्निशमक दलाकडून आग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:53 IST2025-09-07T16:53:40+5:302025-09-07T16:53:58+5:30
आयटी पार्क येथील अग्निशमन यंत्रणा वापरून आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्रातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

येरवडा कॉमरझोन आयटी पार्कमध्ये सहाव्या मजल्यावर आग; अग्निशमक दलाकडून आग आटोक्यात
पुणे : येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्कमधील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला रविवारी (दि.७) सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
आयटी पार्क येथील अग्निशमन यंत्रणा वापरून आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्रातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
जवानांनी आगीवर अर्ध्या तासामध्ये नियंत्रण मिळवले आणि आग इतरत्र पसरू दिली नाही. आगीमध्ये सर्व कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर साहित्य जळाले. आगीत कोणी जखमी झाले नाही. नायडू अग्निशामक केंद्रातील जवान सोन्या नायडू यांच्या पायाला दुखापत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.