शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:15 IST

- इच्छुक उमेदवारांना काही अंशी दिलासा तर हरकत घेणाऱ्या काहींचे समाधान देखील झाले आहे.

पुणे - आगामी  निवडणुकीसाठी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना काही अंशी दिलासा तर हरकत घेणाऱ्या काहींचे समाधान देखील झाले आहे.अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 18 वानवडी - साळुंके विहार या प्रभागाचा शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क - घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्ती चे  रस्त्याने विभाजन झाले होते. प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा चा मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी ला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी - महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी- शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे.

या प्रभागातील के. के.मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक 38  बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 34 नऱ्हे - वडगाव बुद्रुक - आंबेगावचा दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग 38 बालाजीनगर - आंबेगाव- कात्रज या प्रभागाला ला जोडण्यात आला आहे.  तसेच कोळेवाडी ,जांभूळवाडी हा भाग देखील प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर- आंबेगाव - कात्रजला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर - आंबेगाव - कात्रजमधील सुखसागर नगरचा भाग प्रभाग 39 अप्पर सुपर - इंदिरानगर ला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडे सतरा नळी मधील  थिटे वस्ती चा भाग प्रभाग क्रमांक 4 खराडी - वाघोलीला जोडला आहे. विशेष असे की या प्रभागातून सर्वाधिक हरकती आल्या होत्या.या प्रभागांमध्ये झालेत बदल

महापालिकेच्या 165 नगरसेवकांसाठीच्या 41 प्रभागाच्या प्रारूपावर पाच हजार 922 हरकती आल्या होत्या. यापैकी 4,524 हरकती अमान्य करण्यात आल्या तर 1329 हरकती पूर्णतः व 69 हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या प्रभाग क्रमांक 1,4,14,15,17,18,20,24,27,34,38 व 39 या प्रभागांमध्ये बदल झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Announces Final Ward Structure for Elections

Web Summary : Pune's final ward structure is announced after considering objections. Changes include ward boundary adjustments and name alterations, offering relief to some and satisfying others. Several wards saw modifications following numerous objections, including wards 1, 4, 14, 15, 17, 18, 20, 24, 27, 34, 38, and 39.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024