Video : पुण्यातील महापौरांसह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:59 IST2026-02-15T17:56:18+5:302026-02-15T17:59:49+5:30

- या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.

pune news file a case against BJP leaders including the mayor; Congress warns | Video : पुण्यातील महापौरांसह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचा इशारा

Video : पुण्यातील महापौरांसह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचा इशारा

पुणे : दोन ऐतिहासिक व्यक्तींविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.



काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. महापौर मंजुषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच दुष्यंत मोहोळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शिंदे पुढे म्हणाले, उद्या काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. जर गुन्हा दाखल करून अटक झाली नाही, तर याहून मोठे आंदोलन छेडले जाईल.

दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : पुणे भाजपा नेताओं पर मामला दर्ज करो: कांग्रेस की चेतावनी।

Web Summary : कांग्रेस ने महापौर सहित भाजपा नेताओं की विवादास्पद टिप्पणियों और झड़पों पर प्राथमिकी और गिरफ्तारी की मांग की। मांगें पूरी न होने पर और विरोध प्रदर्शन की चेतावनी।

Web Title : File case against Pune BJP leaders: Congress warns police.

Web Summary : Congress demands FIR, arrests of BJP leaders, including the mayor, over controversial remarks and subsequent clashes. Further protests loom if demands unmet.