रिल्सचा अतिरेक..! एफसी रोड परिसरात तरुणाने शू-लेस बांधण्यासाठी बस थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:38 IST2025-05-06T18:37:29+5:302025-05-06T18:38:48+5:30
बसमध्ये न चढता फक्त रिल्ससाठी बसच्या दारात थांबून शूजची लेस बांधली. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.

रिल्सचा अतिरेक..! एफसी रोड परिसरात तरुणाने शू-लेस बांधण्यासाठी बस थांबवली
पुणे - सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाईकडून धोकादायक प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील एफसी रोड परिसरात एका तरुणाने केवळ रिल्ससाठी चालती बस थांबवली आणि बसच्या दारात उभा राहून शू-लेस बांधण्याचा स्टंट केला. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या प्रकारामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमीच वर्दळीचा असलेला एफसी रोड परिसर कॉलेज, दुकाने आणि तरुणाईमुळे सदैव गजबजलेला असतो. अशा ठिकाणी अशा प्रकारचा स्टंट म्हणजे केवळ स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा प्रकार आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, तरुणाने हात करून बस थांबवली आणि कोणतीही गरज नसताना बसमध्ये न चढता फक्त रिल्ससाठी बसच्या दारात थांबून शूजची लेस बांधली. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
या प्रकारावर पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या तरुणावर कोणती कारवाई होणार ? असा सवाल विचारला जात आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अशा प्रकारचे असामाजिक वर्तन निषेधार्ह आहे आणि संबंधित यंत्रणांनी यावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.