ओव्हरटेकिंगचा अतिरेक;सिमेंट ट्रक व गॅस टँकरचा भीषण अपघात; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:03 IST2025-08-26T14:59:14+5:302025-08-26T15:03:20+5:30

अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीने प्रसंगावर नियंत्रण मिळवले.

pune news excessive overtaking; serious accident involving cement truck and gas tanker; loss of life averted | ओव्हरटेकिंगचा अतिरेक;सिमेंट ट्रक व गॅस टँकरचा भीषण अपघात; जीवितहानी टळली

ओव्हरटेकिंगचा अतिरेक;सिमेंट ट्रक व गॅस टँकरचा भीषण अपघात; जीवितहानी टळली

उरुळी कांचन (ता. हवेली) : कोलवडी येथील उंद्रे वस्ती परिसरात मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सिमेंट भरलेला ट्रक व भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकर यांच्यात जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र गॅस टँकर चालक चंद्रशेखरन पी. यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन चार टाके घालावे लागले.

अधिकच्या माहितीनुसार, त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट एजन्सीचा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ६७०६) सिमेंट भरलेला ट्रक थेऊर वरून केसनंदकडे जात होता. ओव्हरटेकिंग करताना तो समोरून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या (एमएच ०४ केएफ ९४५५) एलपीजी गॅस टँकरवर आदळला. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीने प्रसंगावर नियंत्रण मिळवले. अग्निशमन कर्मचारी प्रशांत अडसूळ, शुभम चौधरी, अभिषेक पवार, शुभम पोटे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील राहुल शिंदे व राजेंद्र फुंदे यांनी तत्परतेने हस्तक्षेप करून टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला हलवला. याचबरोबर लोणीकंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. नागरी वस्तीमध्ये झालेल्या या अपघातामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

Web Title: pune news excessive overtaking; serious accident involving cement truck and gas tanker; loss of life averted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.