Video : क्षणात सगळं संपलं..! कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, विद्यार्थ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:15 IST2026-03-25T12:15:15+5:302026-03-25T12:15:27+5:30

या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित घटनेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी,

pune news everything was over in an instant Student dies of electric shock in agricultural college, students protest | Video : क्षणात सगळं संपलं..! कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, विद्यार्थ्यांचे आंदोलन

Video : क्षणात सगळं संपलं..! कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे -  शहरातील कृषी महाविद्यालयात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन सुरू केले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या पाण्याच्या फिल्टरला विजेचा प्रवाह आला होता. त्यावेळी चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थी चैतन्य चव्हाण हा मूळचा आष्टी डोंगरगाव येथील रहिवासी होता. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित घटनेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. तसेच वसतिगृहातील सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने सुधाराव्यात, अशीही मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.  प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title : पुणे कृषि महाविद्यालय में बिजली के झटके से छात्र की मौत.

Web Summary : पुणे के कृषि महाविद्यालय में छात्रावास के वाटर फिल्टर से बिजली का झटका लगने से एक छात्र की मौत हो गई। आक्रोशित छात्र विरोध प्रदर्शन कर रहे हैं, कॉलेज प्रशासन से जवाबदेही और छात्रावास में बेहतर सुरक्षा उपायों की मांग कर रहे हैं।

Web Title : Student dies of electric shock at Pune agricultural college.

Web Summary : A student at Pune's agricultural college died after receiving an electric shock from a water filter in the hostel. Outraged students are protesting, demanding accountability from the college administration and improved safety measures in the hostel following the tragic event.