दस्त नोंदणी आज मध्यरात्रीपासून तीन दिवस बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:29 IST2025-08-14T09:29:42+5:302025-08-14T09:29:52+5:30

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

pune news document registration closed for three days from midnight today | दस्त नोंदणी आज मध्यरात्रीपासून तीन दिवस बंद 

दस्त नोंदणी आज मध्यरात्रीपासून तीन दिवस बंद 

पुणे : खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्व्हर गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीपासून रविवारी (दि.१७) मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दस्तनोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह अन्य सेवा ही बंद राहतील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर शनिवारी व रविवारी पुणे शहरातील २७ पैकी २२ दुय्यम निबंधक कार्यालये बंद असतात, तर पाच दुय्यम निबंधक कार्यालयांमधून दस्त नोंदणी होत असते.

या ठिकाणी एका दिवसाला सरासरी २०० दस्तांची नोंदणी होत असते. सलग तीन दिवस सुटी असली तरी या पाच कार्यालयांमधील दस्तनोंदणीवर फारसा परिणाम होणार नाही. सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीचे काम महत्त्वाचे असून, त्यानंतर सर्व्हरमुळे दस्त नोंदणीला वेग येऊ शकेल. सर्व्हर तीन दिवस बंद असल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे शहर सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी केले आहे.

Web Title: pune news document registration closed for three days from midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.