शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:54 IST2026-02-14T18:54:30+5:302026-02-14T18:54:38+5:30

- शाळांच्या मागणीनुसार ही दुसरी व अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

pune news deadline for submitting applications for scholarship exam extended till 28th February | शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

पुणे :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी व सातवी शिष्यवृत्ती २०२६ परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) या दोन्ही परीक्षा दि. २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी पार पडणार आहेत. या परीक्षेबाबतची अधिसूचना दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. संबंधित माहिती व मार्गदर्शक सूचना परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदत ३० डिसेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ अशी होती. मात्र काही शाळांकडून तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्याची माहिती परिषदेला प्राप्त झाली होती.

शाळांच्या मागणीनुसार ही दुसरी व अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी दिलेल्या नव्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे.

Web Title : छात्रवृत्ति परीक्षा आवेदन की अंतिम तिथि 28 फरवरी तक बढ़ी

Web Summary : चौथी और सातवीं कक्षा की छात्रवृत्ति परीक्षा के लिए ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 28 फरवरी, 2026 तक बढ़ा दी गई है। यह विस्तार स्कूलों द्वारा बताई गई तकनीकी समस्याओं के कारण किया गया है। परीक्षा 26 अप्रैल, 2026 को सभी जिलों में आयोजित की जाएगी। यह अंतिम विस्तार है।

Web Title : Scholarship Exam Application Deadline Extended to February 28th

Web Summary : The deadline for submitting online applications for the Class 4th and 7th scholarship exam has been extended to February 28th, 2026. This extension accommodates technical issues reported by schools. The exam will be held on April 26th, 2026, across all districts. This is the final extension.