नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:16 IST2025-04-12T13:14:29+5:302025-04-12T13:16:45+5:30
जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी..! आंद्रा धरणाच्या पाण्यातून टू व्हीलर चालवण्याचा प्रयत्न,व्हिडीओ व्हायरल

नवी स्टंटबाजी..! आंद्रा धरणातून गाडी चालवली; पाण्याच्या मधोमध नेऊन धुतली, तरुणांचा प्रताप
पुणे : मावळ तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे आंद्रा धरण सध्या एका धोकादायक प्रकारामुळे चर्चेत आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही स्थानिक तरुणांनी धरणाच्या पाण्यातच थेट मोटरसायकल चालवण्याचा प्रकार केला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धोकादायक स्टंट..! तरुणाचा आंद्रा धरणाच्या पाण्यातून मोटरसायकल चालवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/2eOUPS6Jpo
— Lokmat (@lokmat) April 12, 2025
धरणाच्या अगदी जवळ असलेल्या बांधावरून एक तरुण मोटरसायकल घेऊन थेट पाण्यात उतरतो आणि धोकादायक पद्धतीने चालवतो, असं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरणाचे पाणी आणि त्या परिसरातील जमीन निसरडी व खोल असते, त्यामुळे अशा प्रकारची धाडसपूर्ण कृत्यं केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारी ठरू शकतात. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाने लक्ष घालून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे. तसेच, संबंधित तरुणांवर कारवाईचीही शक्यता वर्तवली जात आहे.