धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:42 IST2025-03-30T18:41:12+5:302025-03-30T18:42:21+5:30

चारच्या सुमारास दुकानातील कामगार चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला

pune news Cylinder explosion at tea shop in Dhankawadi; one injured | धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू  

धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू  

-पांडुरंग मरगजे

पुणे - धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत संतोष हेगडे (वय २० वर्षे)  या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

मिळलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास दुकानातील कामगार चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे ग्राहक आणि अन्य कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, संतोष हेगडे दुकानात अडकला. स्फोटानंतर आग भडकली आणि आगीच्या झळा शेजारच्या दोन दुकानांनाही बसल्या, ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले.  
 



कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एक कामगार अडकलेला असल्याचे समजताच जवानांनी पाण्याचा मारा करत त्याला बाहेर काढले. मात्र, गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असल्याचे आढळून आल्याने अग्निशमन दलाने हे सिलेंडर ताब्यात घेतले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता मोकळा केला. घटनेचा पुढील तपास धनकवडी पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहे.

Web Title: pune news Cylinder explosion at tea shop in Dhankawadi; one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.