मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:04 IST2025-12-03T20:04:06+5:302025-12-03T20:04:42+5:30

- भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समावेश : वडगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होईल असे कृत्य

pune news criminal case filed against mayoral candidates for worshipping polling booth | मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा

मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची पूजाअर्चा करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी नगराध्यक्ष पदाच्या भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाजपच्या उमेदवार ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी व भागवत झांबरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार २ डिसेंबरला वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील २४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. त्यावेळी रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ८ या दोन मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केंद्राध्यक्ष दळवी व भागवत यांनी मज्जाव केला असतानाही ॲड. मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे व मयूर ढोरे यांनी दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रातील मतदान कक्षाची पूजाअर्चा केली.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल, असे कृत्य करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१, २२३, १७१ (ब) सह लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१, १३२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम व पोलिस उपनिरीक्षक उमेश जाधवराव हे करत आहेत

Web Title : मतदान केंद्र की पूजा करने पर उम्मीदवार बुक।

Web Summary : वडगाँव में मतदान केंद्र की पूजा करने पर भाजपा, राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्‍मीदवारों पर मामला दर्ज। चुनाव संहिता का उल्‍लंघन करने का आरोप है।

Web Title : Nomination candidates booked for worshiping polling booth in Wadgaon.

Web Summary : BJP and NCP candidates, including ex-president, booked for worshiping polling booth. This violated election code of conduct during the Wadgaon Nagar Panchayat polls.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.