शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात टँकरचा काळाबाजार सुरूच; पाण्याच्या टँकरची चौपट दराने विक्री

By राजू हिंगे | Updated: April 29, 2026 11:07 IST

महापालिका टँकर भरणा केंद्रावर महापालिकेचे स्वत:चे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी असे तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात.

पुणे : एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे टँकरचालकांनी टँकरच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या गरजेप्रमाणे दररोज टँकरचे दर वाढत असून, प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी २ हजार रुपये, तर काही ठिकाणी अडीच हजार, तीन हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. टँकरचा काळाबाजार सुरूच असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत.

महापालिका टँकर भरणा केंद्रावर महापालिकेचे स्वत:चे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी असे तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. महापालिकेच्या तसेच खासगी टँकरचीही मागणी वाढली आहे. पुणे महापालिकेच्या मालकीचे २९ टँकर आहे. पालिकेच्या टँकर पाॅइंटवरून टँकर भरणारे खासगी टँकरधारकाची संख्या ४५ आहे. पालिका ज्या भागाला नळाद्वारे पाणीपुरवठा करत नाही. त्या भागाला ठेकेदारी पद्धतीने निविदा काढून खासगी टँकरधारकांमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.पालिकेच्या टँकर पाॅइंटवर दररोज १ हजार ६५० टँकर भरून जातात. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये वाट्टेल त्या दराने टँकरचालक पाणी देत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो.साडेचाैदाशे रुपयांच्या टँकरसाठी अडीच हजार माेजावे लागतात. खासगी टँकरचालकांकडून महापालिका ७३४ ते १,६३० रुपयांदरम्यान शुल्क आकारते. प्रत्यक्षात नागरिकांना हा टँकर देताना ठेकेदार परिस्थितीनुसार पैसे आकारत असल्याची तक्रार केली जात आहे. एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा. इतर कोणत्याही ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जात असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकरचा पुरवठा करणारा ठेकेदार मागेल तो दर द्यावा लागत आहे. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार २ हजार ते २,५०० रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.

पूर्व भागात मागणी जास्त

शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा, वाघोली, उंड्री, पिसोळी, बावधन बाणेर-बालेवाडी आदी अनेक उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकरभरणा केंद्रांवरून पाणी घेतात, तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. महापालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकर भरणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

..........

खासगी टँकरला मिळणारे दर

टँकर क्षमता - दर

१० हजार लिटरपर्यंत - ७३४ रुपये

१५ हजार लिटरपर्यंत - १,१५६ रुपये

२० हजार लिटरपेक्षा जास्त क्षमतेसाठी - १,६३० रुपये

........

नागरिकांसाठीच्या टँकरसाठी

पुणे महापालिका गेल्यावर्षी नागरिकांना दहा हजार लिटरपर्यंतचा टँकरसाठी आता १ हजार ३०३ रुपयांना मिळत आहे. पालिका हद्दीतील २३ गावे सोडून हे टँकर दिले जात आहेत. 

..........

महिना    -          टँकरची संख्या

फेब्रुवारी -             ४६,०६८

मार्च -            ५८,३४५ -----

पुणे महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर भरलेला टँकरचालक-मालक नागरिकांकडून जास्त पैसे घेत असेल, तर नागरिकांनी तक्रार करावी. त्यावर कारवाई केली जाईल.  - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Water tanker black market persists; prices soar fourfold.

Web Summary : As Pune faces rising temperatures, water tanker prices surge. Private operators exploit demand, charging up to four times the official rate. East Pune suburbs are most affected. The municipality urges citizens to report overcharging.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीCorruptionभ्रष्टाचार