उजनी पाणलोटात पक्षी पर्यटन फुलतेय;पाणलोट क्षेत्रात पक्षांच्या नेत्रदीपक कवायती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:03 IST2026-01-02T13:50:48+5:302026-01-02T14:03:40+5:30
- हा नृत्याविष्यकार इतका देखणा असतो की काळोखात बुडू लागलेली संध्याकाळी जागी होत काही क्षितिजावर थांबते...!

उजनी पाणलोटात पक्षी पर्यटन फुलतेय;पाणलोट क्षेत्रात पक्षांच्या नेत्रदीपक कवायती
भिगवण : उजनी धरणाच्या पाणलोट पहाटेच्या गुलाबी थंडीत विविध प्रकारच्या पक्षांच्या कवायतींमुळे तर सायंकाळी मावळतीच्या वेळी भोरड्या पक्षांच्या कवायतींमुळे संध्याकाळचे वातावरण मोहून टाकत आहे. कधी अवकळ... तर कधी लाजाळू... होत हे पक्षी लाली पसरलेल्या आभाळाला सलामी देतात. लक्ष लक्ष भोरड्यांचे मनोहारी नृत्याविष्कार डोळ्यांचे पारणे फेडतात... त्यांचा हा नृत्याविष्यकार इतका देखणा असतो की काळोखात बुडू लागलेली संध्याकाळी जागी होत काही क्षितिजावर थांबते...!
यंदा झालेला उशिरापर्यंतचा पाऊस उजनी धरण आजही शंभर टक्के भरलेले असल्याने दरवर्षी थंडीच्या दिवसात उजनीच्या पाणलोट उथळ पाणलोट क्षेत्रात लाखोंच्या संख्येने दाखल असणारे पक्षी सध्यातरी मोठ्या प्रमाणात उथळ पाणवटा उपलब्ध नसल्याने अनेक पक्षी दरवर्षी पेक्षा तुलनेत कमीच दिसून येत आहेत यामध्ये थंडीच्या दिवसांत लाखो किलोमीटरचा प्रवास करून येणारा विदेशी पक्षी फ्लेमिंगो (रोहित) हा बोटावर मोजण्या इतकाच दिसून येत आहे.

मात्र देशी पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण, कुंभारगाव, डिकसळ, तक्रारवाडी, पळसदेव व गंगावळण आदी परिसराला उजनी धरणाचा पाणलोट किनारा लाभला असल्याने देश-विदेशांतून पर्यटक भेटी देण्यासाठी येतात. यामुळे मासेमारी करणारे होडीचालक, पक्षी अभ्यासक, हॉटेल व्यावसायिक यांना या पर्यटनामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्याची मागणी
कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे थंडीच्या हंगामात प्रामुख्याने विदेशांतून पक्षी येत असल्याने अनेक पर्यटक येथे भेटी देतात परंतु या परिसरात सरकारच्या पर्यटन विभागाकडून पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी निवासस्थान अशी सोय नसल्याने खासगी पर्यटन केंद्रावर थांबा घ्यावा लागत आहे डिकसळ किंवा कुंभारगाव या ठिकाणी पर्यटन केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.
उजनी काठावर आढळणारे विविध पक्षी
तुतुवार (सँडपायपर), पाणलावा (स्नाईप), चित्रबलाक (पेंटेड स्टार्क), मुग्धबलाक (ओपन बिल स्टार्क), चमचेचोच (स्पून बी), काळा व पांढरे कुदळे (ब्लॅक अँड व्हाईट आयबीस), पाणकावळे (कार्मोरंट), सर्प पक्षी (स्नेक बर्ड), शेकाट्या (स्टील्ट), राखी बगळा (ग्रे हेरॉन), वंचक पॉन्ड हेरॉन), मध्यम व पातळ बगळे (मेडीयम अँड लिट्ल इग्रेट), लाल लाल्या टिटवी (रेड वॅटल्ड लॅपविंग), अबलक व छोट्या खंड्या (पाईड व लिट्ल किंगफिशर), बंड्या (व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर) व पान टिलवा (गॉडवीट) प्रामुख्याने दिसून येतात.
उजनी धरणात पाणी साठा शंभर टक्के असल्याने पक्षांसाठी उथळ पाणथळ क्षेत्र कमी असल्याने दरवर्षी या ठिकाणी येणारा रोहित फ्लेमिंगो पक्षांचे थवे अद्याप आले नाहीत या पंधरवड्यात फ्लेमिंगो पक्षी येतील - दत्ता नगरे (पक्षी मित्र)
पुणेपिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतील केमिकल प्रदूषित पाणी तसेच शेतीत अनेक कीटकनाशके, खते, तणनाशके वाढलेला वापर याचा परिणाम पक्षी प्रजनन आणि जैवविविधता साखळी यावर परिणाम झाला आहे यामुळे घुबडासारखे देशी पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत - भास्कर गटकळ (पक्षी अभ्यासक)
