Bhimashankar temple:भाविकांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबेंसाठी खुले ? प्रशासनावर दुजाभावाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:47 IST2026-03-15T12:43:45+5:302026-03-15T12:47:06+5:30

मंदिर बंद असल्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करत येणाऱ्या भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागत आहे.

pune news Bhimashankar temple, which was closed for devotees, is open for BJP MP Nishikant Dubey? Accusation of malice on the administration | Bhimashankar temple:भाविकांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबेंसाठी खुले ? प्रशासनावर दुजाभावाचा आरोप

Bhimashankar temple:भाविकांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबेंसाठी खुले ? प्रशासनावर दुजाभावाचा आरोप

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या काळातच भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना व्हीआयपी दर्शन देण्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिर बंद असल्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकलवारी करत येणाऱ्या भाविकांना दर्शन न घेता परत जावे लागत आहे. तप-अनुष्ठान करून येणाऱ्या भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी मंदिर उघडण्यात आल्याचे समोर आल्यानंतर सामान्य भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भाविकांच्या मते, मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्यांना कठोर नियम लागू केले जात असताना राजकीय नेत्यांसाठी वेगळे नियम लागू केले जातात का, असा सवाल उपस्थित होत आहे. महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का? असा प्रश्नही भाविक विचारत आहेत.

विशेष म्हणजे, पवित्र महाशिवरात्री निमित्त आठ दिवस मंदिर खुले करण्याची घोषणा प्रशासनाने यापूर्वी केली होती. मात्र मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे त्या दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाविकांनी हा निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला होता. परंतु एका व्हीआयपी व्यक्तीसाठी मंदिर उघडल्याच्या आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार असलेले डॉ. निशिकांत दुबे हे पक्षातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर उघडण्यात आले असल्याची चर्चा सुरू असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,'भीमाशंकर मंदिर सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामामुळे ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी बंद आहे. या कालावधीत दर्शनासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. खासदारांनी दर्शन घेतल्याबाबत मला कोणतीही माहिती नाही. जिल्हा प्रशासनाकडून अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत चौकशी करून माहिती देतो.' सध्या या प्रकरणामुळे भीमाशंकर परिसरात चर्चा रंगली असून मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर भाविकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title : भीमाशंकर मंदिर विवाद: बंद के बीच वीआईपी पहुँच से आक्रोश।

Web Summary : नवीनीकरण के लिए भीमाशंकर मंदिर के बंद होने के बाद आरोप है कि एक भाजपा सांसद को विशेष पहुँच मिली। इस तरजीही व्यवहार ने भक्तों में गुस्सा भड़का दिया है, जिससे प्रशासनिक निष्पक्षता पर सवाल उठ रहे हैं। जिला अधिकारियों ने अनुमति देने से इनकार किया और जांच का वादा किया है।

Web Title : Bhimashankar temple row: VIP access sparks outrage amid closure.

Web Summary : Bhimashankar temple's closure for renovations faces scrutiny after allegations that a BJP MP received special access. This preferential treatment has triggered anger among devotees, questioning administrative fairness. District officials have denied granting permission and promised investigation.