पुणे : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीनंतर ‘मस्तानी’चे फलक झळकावण्यात आले होते. त्यावर इतर पक्षांनी तर सोडाच, पण भाजपच्या देखील एकाही नेत्याने निषेध केलेला नाही.
त्यामुळे एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगाच्या निमित्त पुणेरेल्वे स्टेशनवर ‘थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानकावर हार्दिक स्वागत' असे फलक झळकावून ब्राह्मण महासंघाने उद्धवसेनेला प्रत्युत्तर दिले.
लालकिल्ल्याने महाराजांना कैदेत ठेवण्याचे पाप केले, त्याच किल्ल्याकडून सुरक्षा निधी वसूल करणारे अफगाणिस्तानच्या वेशीवरचा हिरवा झेंडा काढून भगवा फडकवणारे पेशवा तुम्हाला नको असतील, पण आम्हाला पेशवा हवे आहेत. आम्ही आग्रही राहू, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी व्यक्त केली.