बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:38 IST2025-07-16T12:37:45+5:302025-07-16T12:38:27+5:30

मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला.

pune news bank was broken into, but the safe was not broken; the stolen documents scattered and scattered | बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही;हिरमोड झालेले चोरटे कागदपत्रे विस्कटून झाले पसार

पुणे : दोन चोरट्यांना चोरी करण्याच्या उद्देशाने बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला खरे. मात्र, बँंकेची तिजोरी फुटलीच नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केल्याची घटना मांजरी खुर्द येथे घडली.

याप्रकरणी बँक व्यवस्थापक शुभम ब्रजकिशोर शर्मा (वय ३७) यांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला.

चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिजोरी फुटली नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या चोरट्यांनी बँकेतील कागदपत्रे फेकून पोबारा केला. बँकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक शर्मा यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बँकेतील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असून पोलिस हवालदार गोगे तपास करीत आहेत.

Web Title: pune news bank was broken into, but the safe was not broken; the stolen documents scattered and scattered