Video : शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; धीरज घाटेंचा काँग्रेसवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:48 IST2026-02-15T17:47:13+5:302026-02-15T17:48:23+5:30
पुण्यात दगडफेक प्रकरणाने राजकीय वातावरण तापले; भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

Video : शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; धीरज घाटेंचा काँग्रेसवर आरोप
पुणे - दोन ऐतिहासिक व्यक्तींवरील विधानावरून पुण्यात राजकीय वातावरण तापले असून आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमल्याचा आरोप त्यांनी केला. घाटे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, काही व्हिडिओ आमच्याकडे असून त्यात काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये काठ्या जमा करताना दिसत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हे कटकारस्थान होते,असा आरोपही त्यांनी केला.
Video : पुण्यात भाजप-काँग्रेस तणाव; आंदोलनादरम्यान दगडफेक, पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे निदर्शने
पोलिसांकडे तक्रार
या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दगडफेकीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस भवनमध्ये काठ्या का जमा करण्यात आल्या, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.