सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल

By दीपक होमकर | Updated: May 31, 2025 08:07 IST2025-05-31T08:06:05+5:302025-05-31T08:07:25+5:30

पुण्यातील केंद्रीय विद्यालय २१ जूनला होणार सुरु; खासगी शिक्षण संस्थाच्या सर्व शाळा २ ते १६ जूनपर्यंत वेगवेगळ्या दिवशी होणार सुरू

pune news Arbitrary management of CBSE schools Schools resume after ending vacations whenever they feel like it; | सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल

सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल

पुणे : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांवर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा अंकुश नाहीच, मात्र सीबीएससीकडूनही इतका मनमानी कारभार सुरू झाला आहे की, शाळेच्या शुल्कासह शाळा सुरू करण्याच्या (स्कूल रीओपन) तारखाही शाळेच्या सोयीप्रमाणे जाहीर केल्या आहेत. वास्तविक पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय २१ जूनपासून सुरू होत असताना पुण्यातील खासगी शिक्षण संस्थेच्या सीबीएसई शाळांनी मात्र १ जून, ५ जून, ८ जून, १० जून, ११जून अशा वेगेवेगळ्या तारखा ठरवून त्याप्रमाणे पालकांना शाळेच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज केला आहे.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी अर्थात एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या राज्यातील विदर्भ वगळता सर्व शाळा १६ जून रोजी सुरू होणार आहेत. तसे परिपत्रक शिक्षण मंडळाकडून शाळांना पाठविले आहेत. शाळांना ते नियम बंधनकारक असून १६ जूनच्या आधी किंवा किंवा नंतरच्या तारखांना शाळा सुरू करता येणार नाही तसे केल्यास त्या शाळांवर कारवाई केली जाते. असा नियम सीबीएसई शाळांनाही अपेक्षित असताना शाळांकडून मात्र शाळेच्या आणि संस्थेच्या सोयीप्रमाणे शाळा सुरू केली जाते.

सीबीएसई शाळेकडून वर्षभरातील सुट्यांचे परिपत्रक जाहीर केले जाते त्यामध्ये व्दितीय सत्राची परीक्षा कधी घ्यावी, कधी संपवावी आणि नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे त्यानंतर कधी सुट्या द्याव्यात याचे वेळापत्रक दिलेले असते मात्र पुण्यातील बहुतांश शाळा त्या वेळापत्रकाचे पालन करत नाही.  

उन्हाळ्याची सुटी ५० दिवस

केंद्रीय विद्यालयाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्षे १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सुरू झाले होते, त्यानंतर १ मे पासून उन्हाळ्याची सुटी (समर व्हेकेशन) सुरू झाली. सीबीएससी संलग्न बहुतांश शाळांनी सुध्दा उन्हाळी सुटी १ मे पासून सुरू केली. केंद्रीय विद्यालयाने सुमारे ५० दिवस सुटी देत २१ जून रोजी सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

शाळा सुरू होण्याच्या शाळांच्या तन्हा

२ जून: आरएमडी सिंहगड स्कूल, वारजे, युरेका इंटरनॅशनल स्कूल, जेएसपीएम हडपसर, सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव, जीजीआयएस बावधन, सेंट झेविअर्स, होली मिशन, सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, टिकेकरनगर, वॉलनट स्कूल, शिवणे
३ जून: ऑर्चिड स्कूल, आंबेगाव. ५ जून: पोदार स्कूल, आंबेगाव, सिटी इंटरनॅशनल स्कूल, सातारा रोड.
उपसंचालक, शिक्षण विभाग पुणे.
९ जून : दिल्ली पब्लिक स्कूल, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, पोलिस पब्लिक स्कूल, होली एंजल्स, द ऑर्बिस स्कूल, कलमाडी स्कलू, कर्वेनगर, संस्कृती स्कूल, उंड्री, न्यू पुणे पब्लिक स्कूल
११ जून: आर्यन स्कूल, भिलारवाडी, विद्याशिल्प पब्लिक स्कूल, आर्यन वर्ल्ड स्कूल, कात्रज.
१२ जून : माउंट कार्मेल स्कूल, सांगवी
१६ जून: नासेंट किग्जवे स्कूल,
२१ जून : पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय  

सीबीएसटीचे पॅटर्न बदलण्याची मागणी

एसएससी अभ्यासक्रमाच्या शाळांची वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर होतात आणि सुट्या संपल्यावर १६ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. हाच पॅटर्न सीबीएसईनेसुद्धा राबवावा आणि उन्हाळी सुटी संपल्यावरच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

जिल्ह्यात १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी ३१ मे रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 आम्ही फक्त एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांनाच सुट्या व परीक्षांच्याबाबत सूचना देतो, सीबीएससीच्या शाळांना केंद्रीय बोर्डाकडून त्यांच्या सूचनांचे परिपत्रक येते. त्यामुळे त्यांना आम्ही सूचना देत नाही. - सुनंदा वाखारे,उपसंचालक, शिक्षण विभाग पुणे. 

Web Title: pune news Arbitrary management of CBSE schools Schools resume after ending vacations whenever they feel like it;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.