जिल्ह्यातील भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 10:00 IST2025-07-19T09:58:52+5:302025-07-19T10:00:10+5:30

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली जातात.

pune news agristake Commissionerate established in the state; Aggregate information on agricultural industries under one roof, will be started in two months, 14 people will be recruited | जिल्ह्यातील भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आदेश

जिल्ह्यातील भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आदेश

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरमालकांनी भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलिस ठाण्याकडे सादर करावीत, असे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तत्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरमालकांनी ही माहिती पोलिस ठाण्याला सादर करावी. भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला न दिल्यास घरमालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

Web Title: pune news agristake Commissionerate established in the state; Aggregate information on agricultural industries under one roof, will be started in two months, 14 people will be recruited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.