पुणे महापालिकेत महिला उपायुक्तांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:12 IST2026-04-10T12:12:04+5:302026-04-10T12:12:13+5:30

- दालनात शिरल्यानंतर महिलेने उपायुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

pune news a woman deputy commissioner was abused in the Municipal Corporation; a case was registered against the woman for obstructing government work. | पुणे महापालिकेत महिला उपायुक्तांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत महिला उपायुक्तांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीत एका महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी (दि. ८) दुपारी घडली. या प्रकारामुळे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता पटेकर (रा. मांगडेवाडी, कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महापालिका कर्मचारी राकेश विटकर (५३) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक, क्रीडा व सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत या आपल्या दालनात शासकीय कामकाज पाहत होत्या. यावेळी संशयित आरोपी महिला पटेकर हिने कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय राऊत यांच्या दालनात प्रवेश केला. दालनात शिरल्यानंतर महिलेने उपायुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

मोठ्या आवाजात आरडाओरडा आणि अरेरावीची भाषा वापरत तिने कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या गोंधळामुळे विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली आणि काही काळ कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. गोंधळ सुरू असतानाच, संशयित आरोपी महिलेने आपल्या मोबाईलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून महिला अधिकाऱ्याची आणि पालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: महिला ने महिला उपायुक्त को दी गालियां; मामला दर्ज।

Web Summary : पुणे महानगरपालिका कार्यालय में एक महिला ने महिला उपायुक्त के कक्ष में घुसकर उन्हें गालियां दीं। पुलिस ने घटना के बाद महिला कविता पाटेकर के खिलाफ मामला दर्ज किया, जिससे कार्यालय का काम बाधित हुआ।

Web Title : Pune: Woman verbally abuses female Deputy Commissioner; Case filed.

Web Summary : A woman barged into Pune Municipal Corporation office and verbally abused a female Deputy Commissioner. Police filed a case against the woman, Kavita Patekar, following the incident, which disrupted office work.