पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर तिसऱ्या डोळ्याची नजर;नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:23 IST2026-04-01T09:23:19+5:302026-04-01T09:23:50+5:30

- नदीपात्रात १६८ ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही

pune news a third eye on riverbeds for flood control; attention to those who create ruckus in the river | पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर तिसऱ्या डोळ्याची नजर;नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष

पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर तिसऱ्या डोळ्याची नजर;नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष

पुणे : पावसाळ्यामध्ये नदीला येणाऱ्या पुरावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने नदीपात्रात १६८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर नियंत्रणाच्या कामात मदत होणार असून, नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवरही नजर राहणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

पावसाळ्यात मुळा, मुठा नदीसह शहरातील ओढ्यांना येणारे पूर, तसेच काही भागांत ढगफुटीसारख्या घटनांमुळे रस्त्यांनाही पुराचे स्वरूप येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील पाणी खडकवासला धरणातून सोडले जाते. पावसाळ्यात धरणे भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यास त्याचा पहिला फटका नदी पात्रालगत भागांना बसतो. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.

गेल्या वर्षी सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरीसह अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहितीचा अभाव आणि तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पर्जन्यमापक यंत्रे, सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष यांचा समन्वय साधून पूर्वसूचना प्रणाली मजबूत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीपात्रात एकूण १६८ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४४ ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित झाले असून, आणखी १४ ठिकाणी बसवण्याचे काम सुरू आहे. हे कॅमेरे २४ तास सुरू राहावेत, यासाठी काही ठिकाणी सौरऊर्जेचा, तर काही ठिकाणी वीजपुरवठ्याचा वापर केला जाणार आहे.

दरम्यान, नदीपात्रात बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा आणि कचरा टाकण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर अशा घटनांना आळा बसेल असा दावा प्रशासनाने केला आहे.

 सीसीटीव्ही यंत्रणेमुळे धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचे प्रमाण, नदीतील पाण्याची पातळी आणि संभाव्य पूरस्थिती यावर सतत लक्ष ठेवता येणार आहे. तसेच, नदीपात्रात बेकायदेशीररित्या राडारोडा किंवा कचरा टाकण्याच्या प्रकारांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. - गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका. 

Web Title : बाढ़ नियंत्रण, कचरा निगरानी के लिए पुणे ने नदी तल पर सीसीटीवी लगाए

Web Summary : पुणे नगर निगम ने बाढ़ और अवैध कचरा निपटान की निगरानी के लिए नदी तल पर 168 सीसीटीवी कैमरे लगाए। इसका उद्देश्य आपदा प्रबंधन में सुधार करना और बढ़ते जल स्तर से होने वाले नुकसान को रोकना है, खासकर सिंहगढ़ रोड जैसे क्षेत्रों में।

Web Title : Pune Installs CCTV on Riverbeds for Flood Control, Waste Monitoring

Web Summary : Pune Municipal Corporation installs 168 CCTV cameras along riverbeds to monitor floods and illegal waste disposal. This aims to improve disaster management and prevent damage from rising water levels, addressing past flooding issues in areas like Sinhagad Road.