केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:52 IST2025-08-14T11:52:07+5:302025-08-14T11:52:26+5:30

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली

pune news a slab of a bridge on a service road along the highway near Kelvade collapsed; question mark over the quality of the work | केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नसरापूर : सातारा-पुणे महामार्गालगत केळवडे (ता. भोर) येथील कृष्णाई हॉटेलजवळ असणाऱ्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळी घडलेल्या या घटनेत पुलाच्या स्लॅबमधील तारा उघड्या पडल्या असून, ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने खड्ड्याभोवती दगड आणि इतर वस्तू ठेवून अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीला सकाळपासून माहिती देऊनही दुरुस्तीसाठी एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप यांनी दिली.

सातारा-पुणे महामार्गावरील कामे नेहमीच निकृष्ट दर्जामुळे चर्चेत राहिली आहेत. ‘‘पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अशा प्रकारची कामे होत असतील, तर याला जबाबदार कोण?’’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने न केल्यास भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Web Title: pune news a slab of a bridge on a service road along the highway near Kelvade collapsed; question mark over the quality of the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.