ओतूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:54 IST2026-04-05T12:54:07+5:302026-04-05T12:54:26+5:30

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

pune news a bike rider was killed, one seriously injured in a collision with an unknown vehicle near Dholwad junction. | ओतूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

ओतूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

ओतूर (पुणे जि.) : जुन्नर तालुक्यातील ओतूर–ओझर–नारायणगाव मार्गावरील धोलवड फाट्याजवळ रविवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी झालेल्या  अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर (क्र. MH 17 DA 3520) या दुचाकीवरून दोन युवक ओझरच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास धोलवड फाट्याजवळील ‘हॉटेल कोकण पॅलेस’ समोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व वाटसरूंनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले आणि ॲम्ब्युलन्सच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल केले.

ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणी केली असता सोपान यशवंता लांघी (वय २७, रा. मवेशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या जखमीवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. फरार अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. या मार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेगमर्यादा पाळून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title : ढोलवड के पास हिट-एंड-रन में एक की मौत, एक घायल

Web Summary : ढोलवड फाटा के पास एक हिट-एंड-रन में एक व्यक्ति की मौत हो गई और दूसरा गंभीर रूप से घायल हो गया। घटना में एक तेज रफ्तार अज्ञात वाहन ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी। पुलिस दुर्घटना की जांच कर रही है और मौके से फरार चालक की तलाश कर रही है। यातायात अस्थायी रूप से बाधित रहा।

Web Title : One Killed, Another Injured in Hit-and-Run near Dholwad

Web Summary : A hit-and-run near Dholwad Phata claimed one life and seriously injured another. The incident involved a speeding unidentified vehicle hitting a motorcycle. Police are investigating the accident and searching for the driver who fled the scene. Traffic was temporarily disrupted.