रेशनवरील ६८ हजार लाभार्थी अपात्र, मिशन सुधार अभियानांतर्गत गंडांतर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:26 IST2026-01-13T16:25:32+5:302026-01-13T16:26:01+5:30

पुणे जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ११२; राज्यात ८८ लाख ५८ हजार ५४० लाभार्थी संशयास्पद

pune news 68 thousand beneficiaries on ration are ineligible, misappropriation under Mission Improvement Mission | रेशनवरील ६८ हजार लाभार्थी अपात्र, मिशन सुधार अभियानांतर्गत गंडांतर...!

रेशनवरील ६८ हजार लाभार्थी अपात्र, मिशन सुधार अभियानांतर्गत गंडांतर...!

पुणे : राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करून मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थींना वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभर ‘मिशन सुधार अभियान’ राबविण्यात येत असूनस जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थ्यांवर गंडांतर आले आहे. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद जिल्हानिहाय या लाभार्थींची यादी करण्यात आली आली असून, पुरवठा निरीक्षक घरोघरी तपासणी करत आहेत. ही नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारने राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आधार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ८८ लाख ५८ हजार ५४० लाभार्थी संशयास्पद आढळले आहेत. त्यासाठी आधार क्रमांकातील त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे. अशा संशयास्पद त्रुटी असलेल्या आधार क्रमांक असलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत आहे. तसेच दुबार आधार क्रमांक असलेले, मूळचे भारतीय; परंतु परदेशी नागरिकत्व मिळालेले आणि त्यांचे आधार निलंबित झालेले, तसेच आधार चुकीचे असलेले नागरिक केंद्र सरकारने शोधून राज्यांकडे दिले आहेत. 

पुरवठा निरीक्षक ही पडताळणी करत आहेत. पुणे जिल्ह्यात अशी १ लाख ३५ हजार ११२ संशयास्पद लाभार्थी होते. त्यानुसार संशयास्पद असलेल्या लाभार्थींच्या माहितीत तथ्य आढळल्यास ती नावे वगळण्याची शिफारस निरीक्षकांनी तहसीलदारांकडे केली होती. नावे वगळण्याचा अंतिम अधिकार तहसीलदारांना असल्याने आतापर्यंत ६८ हजार ३०९ लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ११ हजार ३३६ लाभार्थी इंदापूर तालुक्यातील आहेत. अनेक लाभार्थींची नावे दोनपेक्षा अधिक ठिकाणी नोंदण्यात आलेली आहेत. त्यात राज्यातील आणि राज्याबाहेरील लाभार्थींचाही समावेश आहे. यांचीही यात पडताळणी केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थींचे वय १०० वर्षांपेक्षा अधिक आहे, अशांचीही माहिती घेतली जात आहे. तसेच जे लाभार्थी एकल आहेत आणि त्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे, अशांनाही या संशयास्पद लाभार्थींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय अपात्र लाभार्थी

वेल्हे ८४९

शिरूर ५,८८०

मुळशी २,६१०

इंदापूर ११,३३६

जुन्नर ६,२६७

मावळ ५,१३३

बारामती ९,३३८

भोर २,०२१

खेड ८,२१७

आंबेगाव ४,१२५

पुरंदर ३,६८६

दौंड ४,९५२

हवेली ३,८९५

एकूण ६८,३०९

Web Title : पुणे जिले में 68,000 राशन कार्ड धारक अपात्र: कार्रवाई!

Web Summary : पुणे जिले में 'मिशन सुधार' के बाद 68,000 से अधिक राशन कार्ड धारक अपात्र घोषित। आधार डेटा के माध्यम से विसंगतियां पाई गईं। डुप्लिकेट, मृत और संदिग्ध लाभार्थियों को हटाने के लिए सत्यापन जारी। तहसीलदारों के पास अंतिम अधिकार।

Web Title : 68,000 Ration Card Holders Ineligible in Pune District: Crackdown!

Web Summary : Over 68,000 ration card holders in Pune district deemed ineligible after 'Mission Sudhar'. Discrepancies found via Aadhaar data. Verification underway to eliminate duplicate, deceased, and suspect beneficiaries. Tahsildars have final authority.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.