पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:37 IST2026-02-18T11:33:50+5:302026-02-18T11:37:22+5:30

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

pune news 10 lakh smart electricity meters installed in Pune circle, Pune residents get Rs 8.5 crore discount in seven months | पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर बसविले, सात महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे : महावितरण पुणे परिमंडलात वीज ग्राहकांची संख्या ३९ लाख ७१ हजार इतकी असून, त्यापैकी ९ लाख ८४ हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जात असून, या सवलतीपोटी गेल्या सात महिन्यांत (जुलै २०२५ ते जानेवारी २०२६) पुणेकरांना ८ कोटी ६० लाखांचा लाभ मिळाला आहे. हे मीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

महावितरणला लागणाऱ्या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. या स्वस्त विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणाऱ्या वीज दरावर प्रतियुनिट ८० पैसे प्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत १ रुपया प्रतियुनिटपर्यंत जाणार आहे. या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे आवश्यक आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्तापेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ३ लाख ६६ हजार ८६७ टीओडी मीटर आहेत. रास्ता पेठ शहर मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, या मंडलात ३ लाख ६३ हजार ७४२ टीओडी मीटर ग्राहक आहेत. तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये २ लाख ५४ हजार ३५३ टीओडी मीटर/ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- ३ कोटी ६९ लाख ३४ हजार २ रुपये, रास्तापेठ- ३ कोटी ५३ लाख ६२ हजार ६५९ रुपये, तर पुणे ग्रामीण- १ कोटी ३७ लाख ७५ हजार ५६० रुपये सवलत मिळाली आहे.

मंडल एकूण ग्राहक टीओडी ग्राहक सवलत (रुपये)

गणेशखिंड शहर मंडल १४७२२२३ - ३६६८६७ - ३,६९,३४,०७२

रास्तापेठ शहर मंडल १५०३२२५- ३६३७४२- ३,५३,६२,६५९

पुणे ग्रामीण मंडल ९९६४१५- २५४३५३- १,३७,७५,५६०

पुणे परिमंडल एकूण ३९७१८६३- ९८४९६२- ८,६०,७२,२९१ 
 

काही ठिकाणी नवीन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. -  सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

Web Title : पुणे में 10 लाख स्मार्ट मीटर, ₹8.6 करोड़ की छूट!

Web Summary : पुणे में 10 लाख स्मार्ट मीटर लगे, सात महीनों में ₹8.6 करोड़ की छूट मिली। टीओडी मीटर वाले ग्राहकों को दिन में ₹0.80/यूनिट की बचत। सहयोग का आह्वान किया गया।

Web Title : Pune Achieves 1 Million Smart Meters, Offers ₹8.6 Cr Discount.

Web Summary : Pune installs a million smart meters, granting ₹8.6 crore discount in seven months. Customers with TOD meters save ₹0.80/unit during daytime. More savings are coming; cooperation urged.