शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mayor : भाजपमधील अनेक दावेदार नाराज; पुण्यातील अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:35 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : पुणे महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर महापौरपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला होता. मात्र गुरुवारी जाहीर झालेल्या महापौरपदाच्याआरक्षण सोडतीने अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फेरले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडेच जाणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र आरक्षण अंतिम न झाल्याने महापौरपदाच्या नावावर सस्पेन्स कायम होता.याआधी २०१२ साली महापौरपद महिला ओबीसीसाठी तर २०१७ मध्ये सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित होते. त्या वेळी अनेक पुरुष नगरसेवकांना संधी मिळाली होती. यंदा मात्र महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या महापौरपदाच्या महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्या आहेत.पालिकेचा निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुकांनी आपणच महापौर होणार, या अपेक्षेने तयारी सुरू केली होती. काही भागांत शुभेच्छांचे बॅनरही झळकले होते. मात्र आरक्षण महिलांसाठी निश्चित झाल्याने माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले आहे. आता भाजपकडून कोणत्या महिला नगरसेविकेच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Mayor Post Reserved for Women, Aspirants Disappointed

Web Summary : Pune's mayoral seat is now reserved for women, dashing the hopes of many male BJP corporators eyeing the position. The announcement followed the reservation draw, sparking speculation about which female corporator will be selected by the BJP.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाreservationआरक्षणMayorमहापौर