PMC Mayor Reservation Lottery: पुणे महापालिकेवर भाजपची स्पष्ट सत्ता स्थापन झाल्यानंतर आता महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापौरपदाचीआरक्षण सोडत आज (गुरुवारी) जाहीर होत असून, यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. मात्र, आरक्षण निश्चित न झाल्याने महापौरपदासाठीचे नाव जाहीर होण्यास विलंब होत होता. अखेर आज मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत एससी महिला आणि ओबीसी पुरुष आरक्षण न निघाल्याने त्या वर्गातील इच्छुकांमध्ये नाराजी होती. मात्र, यंदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून अधिकृत महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर 1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)2. नवी मुंबई: सर्वसाधारण3. वसई- विरार: सर्वसाधारण4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती5. कोल्हापूर: ओबीसी6. नागपूर: सर्वसाधारण7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण8. सोलापूर: सर्वसाधारण9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)10. अकोला: ओबीसी (महिला)11. नाशिक: सर्वसाधारण12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण13. पुणे: सर्वसाधारण14. उल्हासनगर: ओबीसी15. ठाणे: अनुसूचित जाती16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)17. परभणी: सर्वसाधारण18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण20. मालेगाव: सर्वसाधारण21. पनवेल: ओबीसी22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण25. जळगाव: ओबीसी (महिला)26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)27. धुळे: सर्वसाधारण (महिला)28. जालना: अनसूचित जाती (महिला)29. इचलकरंजी: ओबीसी
Web Summary : Pune and Pimpri-Chinchwad will have women mayors as the seats are reserved for the general category. BJP's majority in Pune makes it likely they will hold the position.
Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड में महिला महापौर होंगी क्योंकि सीटें सामान्य वर्ग के लिए आरक्षित हैं। पुणे में भाजपा के बहुमत से यह पद उनके पास रहने की संभावना है।